ऑल इंडिया पॅंथर सेनेचे, राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांची उमरखेड येथील पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्याशी भेट!

ऑल इंडिया पॅंथर सेनेचे, राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांची उमरखेड येथील पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्याशी भेट!

“””””””””””””””‘””””””””””””””””””””””””””””””””

बातमी, उमरखेड साखरा उंमरखेड साखरा येथील भेटीचा संदर्भ

“”””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””

राजेश ढोले यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी

दिनांक 6 मार्च 2022 रोजी, साखरा तालुका उमरखेड येथील अल्पवयीन अत्याचार, पीडित अल्पवयीन मुलीची माहिती मिळताच मराठवाडा विदर्भ दौऱ्यावर असलेले ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी तात्काळ उमरखेड येथील पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेण्यात आली याप्रसंगी, अत्यंत संवेदनशील विषयावर चर्चा करण्यात आली साखरा येथील दोन अल्पवयीन मुलीवर ज्या नराधमांनी अत्याचार केला ती घटना अत्यंत निंदनीय असून फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्राला लाजिरवाणी गोष्ट आहे, या प्रकरणातील आरोपी दहा दिवसांपासून फरार असून पोलिस अधिकारी मात्र मूग गिळून गप्प बसल्याचे चित्र दिसत आहे, या वेळी पोलिसांना ऑल इंडिया पॅंथर सेनेकडून 24 तासाचा अल्टिमेटम देण्यात आला .

आरोपीला त्वरित अटक न केल्यास संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करण्यात येईल असा गर्भित इशारा याप्रसंगी देण्यात आला, अतिसंवेदनशील प्रसंगी घडलेल्या उमरखेड तालुक्यातील साखरा येथील अत्याचार पीडित मुलीच्या, आईवडिलांची सांत्वनपर, भेट घेण्यात आली व ऑल इंडिया पॅंथर सेना सदैव आपल्या पाठीशी उभी असल्याचे याप्रसंगी बोलताना सांगितले याप्रसंगी, ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, विनोद भाई गोळे, विदर्भ अध्यक्ष, दादासाहेब ढोले रिपब्लिकन वार्ता चे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी राजेश ढोले,हदगाव उमरखेड येथील कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Updated : 8 March 2022 1:32 PM GMT

Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.