एक ध्येयवेडा कोरोनावीर अवलिया म्हणजेच डॉ. अजय कांत

एक ध्येयवेडा कोरोनावीर अवलिया म्हणजेच डॉ. अजय कांत

(फुलचंद भगत)

वाशिम:-जिल्ह्यात असणार्‍या कारंजातील अतिशय कमी वेळामध्ये आपलं नाव कारंजा परिसरात असो की वाशिम जिल्ह्यातील परिसर असो’ की अकोला जिल्ह्यातील परिसर असो, या सर्व जिल्ह्यामध्ये आपल्या सर्वांचे परिचित असलेलं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ अजय कांत सर आहेत.लोक सांगतात की आम्ही अनुभवलेलं covid-19 ची सात संपूर्ण जगामध्ये पसरली असता प्रत्येकाच्या मनामध्ये अगदी भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं सर्व मनाने खचलेली होती. भयभीत झालेली होती. अशा काळात आपल्या कर्तृत्वाने व एकनिष्ठेने पालन करून सामाजिक दायित्व डॉ साहेबांनी प्राण पणाला लावून जोपासलेलं आहे. त्यांच्याबद्दल खरंच अभिमान व्यक्त करण्यासाठी आपल्याकडे शब्दरूपी अनेक शब्द आहे. म्हणून असंख्य शब्द त्यांच्या या प्रयत्नाला आपण संबोधित करू शकतो. ध्येयवान, कीर्तिवान, सामर्थ्यवान, कर्तव्यनिष्ठ, कर्तव्यदक्ष, पालनकरता, असंख्य शब्द त्यांच्या या नावाला आपण देऊ शकतो, खरंच त्यांचा गौरव हा प्रत्येक कारंजावासयांनी करावा असं मनात वाटत राहतं. अत्यंत बिकट परिस्थितीत अत्यंत कठीण प्रतिकूल परिस्थितीतून जेवढ्या असलेल्या साधनांचा उपयोग करून त्यांनी निरंतर सेवा प्रदान केली आहे. आम्ही यांच्या सेवा करण्याच्या देवरूपी माणसाला मनातून मुजरा करतोय त्यांनी उपजिल्हा कारंजा लाड येथील हॉस्पिटल ला ही सुविधा प्रधान केली ती अतिशय मौल्यवान मोती सारखी होती. गरीब जनता त्यांची देवासारखी वाट बघत राहत होती. प्रत्येक पेशंट जवळ जाऊन ममतेचा मायेचा दयासागर हात फिरहून पेशंटला बळ देत होते. असंख्य रुग्ण त्या वेळी हॉस्पिटलमध्ये भरती होत पण त्यांच्यामध्ये तीच नवऊर्जा, नवचैतन्य, नेहमी राहत होतं एक नव्हे १० नव्हे तर अगदी १००ते ११० पेशंट त्यावेळी आपल्या हॉस्पिटलमध्ये सर नेहमी पाहत होते. त्यांचा तो राहुड पाच ते सहा तास चालत होता त्या पीपी किट मध्ये माणूस साधा एक मिनिट राहू शकत नाही तर देवरूपी माणूस तर म्हणजे चार ते पाच तास घालून राहत होता.जो शब्द रूपामध्ये न सांगण्यासारखा आहे खरंच एक देवी शक्ती त्यांच्या मनामध्ये सतत संचार करत होती आपला परिवार दूर ठेवून सेवा देण्याचं खुप कठीण असतं पण सरांनी अतिशय प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पडले होते. त्यांच्या देवी रुपी सेवेमुळे खरंच आपल्या सर्वांच्या पंखात बळ पेरण्यासारखे होते.खरं तर या परिवाराला पिढीजात हा सेवा करण्याचा वारसा लाभलेला आहे. त्यांच्या आई व वडिलांच्या वैद्यकीय सेवेने आधीच त्यांचे बीज रुपी ज्ञान मिळवलेले आहे व त्यामध्ये भर टाकून डॉ अजय कांत व डॉ सौ अनघा कांत त्यांनी आपलं दायित्व निभावत आहेत व आपल्या कारंजेवासीयांसाठी अविरत सेवा चालू आहे.सामाजिक बांधिलकीची जाण ठेऊन समाजातील प्रत्येक घटकातील लोकांना आपल्या अचूक निदान, ट्रीटमेंट व मार्गदर्शनाने प्रभावित केले. व आपल्या बोलक्या गोडरूपे शब्दामुळे ते प्रत्येकाच्या मनावर अभी राज्य करत गेले. मला माहिती आहे की ते आपल्या कारंज्याचे विकास पुरुष आमदार स्व प्रकाशदादा डहाके यांचे निकटवर्तीय होते. दादांच्या नेतृत्वात नगर परिषदेतही त्यांनी अधिकृत योगदान दिले. डॉ असोसिएशन चे अध्यक श्री बेरार एज्युकेशन सोसायटी अश्या अनेक सामाजिक संघटना, संस्था, इत्यादी लोकोपयोगी संघटनांमध्ये त्यांनी अध्यक्षपद भूषविलेले आहेत.

‘कोविड’ करोना काळात वैद्यकीय सेवा देतांना अत्यन्त जोखीम पत्करून आपला व्यवसाय सुरू ठेऊन सामाजिक व धार्मिक सांस्कृतिक कार्यामध्ये ही आपलं स्थान निर्माण केलेल आहे.

व त्यासोबतच समाजातल्या सर्व घटकांशी प्रत्येक माणसासाठी सलोख्याने संबंध प्रस्तापित करणे, प्रत्येकाला सर्व बाबींची पूर्तता करणे प्रत्येक घटकासाठी निःपक्ष धोरण ठेवणे, सहकारी वर्गाला उत्साही आनंदी ठेवणे, समाजहित जोपासणे आणि इतका व्याप सांभाळून सुद्धा स्वतःच्या कुटुंबाला वेळ देऊन त्याची प्रतिष्ठा कायम ठेवणे यात डॉ अजय अग्रेसर आहेत आज मला मोठ्या उत्साहाने अभिमानाने सांगा असं वाटते की आज देहरूपी, ज्ञानरूपी, कर्तव्य रुपी, कर्तव्यनिष्ठ, कार्यक्षम, कर्तव्यदक्ष क्षम, कीर्तिवान कारंजा परिसरातील अलोकिक असलेले व्यक्तिमत्व आदरणीय श्री श्रीमान अजयजी कांत सर यांची त्यांच्या कर्तुत्वामुळे चौफेर ख्याती पसरली आहे.

प्रतीनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

मो.8459273206

Updated : 5 March 2022 8:46 PM GMT

Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.