ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या प्रतिमेला चपलाने बदडून दहन।

यवतमाळ — माजी आमदार वामन कासावार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ऊर्जा मंत्री ना डॉ नितीन राऊत यांनी सरसंघचालक हेडगेवार यांच्या बाबत अपमानास्पद उदगार काढले। डॉ हेडगेवार यांना त्यांनी गुलाम म्हंटल त्यामुळे लोकांच्या भावना भडकल्या। परिणामी यवतमाळ जिल्ह्यातील भाजपा कार्यकर्ते संतप्त झाले। राऊत यांच्या विधानाचा निषेध करण्यात आला। वणी येथील शिवाजी चौकात ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या प्रतिमेला चपलाने बदडून दहन करण्यात आले। यावेळी भाजप च्या महिला आणि पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्याने उपस्थित होते। यावेळी नितीन राऊत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली।
Updated : 25 Jan 2022 9:07 PM GMT