उन्हाळी परीक्षा ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही पर्याय उपलब्ध करूण देन्या करिता अमोलोकचंद विधि विद्यालयाचे विद्यार्थीचे मुख्यमंत्री यान्ना निवेदन

उन्हाळी परीक्षा ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही पर्याय उपलब्ध करूण देन्या करिता अमोलोकचंद विधि विद्यालयाचे विद्यार्थीचे मुख्यमंत्री यान्ना निवेदन

जाकीर हुसेन – 9421302699

यवतमाळ : आगामी उन्हाळी परिक्षेबाबत हजारो विद्यार्थांच्या मनामध्ये संभ्रम व भिंतीचे वातवरण आहे. राज्य शासनाने कुठल्याही परिस्थीतीचा आढावा न घेता तसेच विद्यार्थांची समस्या जाणुन न घेता उन्हाळी परीक्षेचा निर्णय सर्वस्वी विद्यापीठाना दिले असुन विद्यापीठाकडून मनमानी कारभार होत असल्याचे निदर्शनास येत आहे

ते म्हणजे येणेप्रमाणे

१) राज्य शासनाने महविद्यालया सुरु करणे संदर्भात घेतलेला निर्णय चांगलेच परंतू त्यामागील हेतू म्हणजे ऑफलाईन परिक्षा घेणे हाच होता का? याचा मात्र आम्हा विद्यार्थाना प्रश्न पडतोय. राज्य शासनाने महाविद्यालय सुरु केलेले आहे परंतू विद्यार्थ्यांची उपस्थिती किती प्रमाणात आहे याचा मात्र लेखाजोखा शासन प्रशासनाकडे बोलावल्याचे दिसत नाही. आज महाविद्यालय जरि सुरु केले असले परंतू विद्यार्थी हा महविद्यालयाच्या तासिकेला मुकताना दिसत आहे. असे असुन विद्यार्थी महाविद्यालयात गैरहजर असल्याचे कारण मात्र शोधायला कोणालाच वेळ दिसत नाही.

तासिकेला येणार्या विद्यार्थी पैकी ७०% ते ८०% प्रमाणात विद्यार्थी ग्रामीण भागातून येत असतात आणि विशेष म्हण आमचा यवतमाळ जिल्हा भौगोलिक दृष्टिने मोठा असल्याने १६ तालुक्यातील विद्यार्थी व विद्यार्थिनी जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षणाकरिता अनेक कानाकोपर्यातून येत असतात त्यांच्या येण्याचे व जिल्हयाला तालुक्या शी जोडण्याचे एकमेव मार्ग म्हणजे महाराष्ट्राची जीवनदायीणी एस. टी. महामंडळाची लालपरी (बस). गेल्या अनेक महिन्यांपासुन एसटी आगार कर्मचारी संपावर असल्याने लालपरी चे दर्शन च आम्हा विद्यार्थ्यांना अजुन घडलेले नाही व आम्हां विद्यार्थीकडे ये-जा करणे करिता एस.टी बसेस शिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नाही करिता महाविद्यालयाचे तासिकेला हजेरी लावणे ही जणु आमची स्वप्ने च बनलेली आहे

काही का प्रमाणात होईना पण अजुन सुद्धा कोविड-19(कोरोना) संदर्भातील भीती आम्हां विद्यार्थी व पालकांमध्ये कायम आहेतच होस्टेल, प्रवास, मेस व ईत्यादी मुद्दे जसेच्या तसे आहे असे असताना सुद्धा जर आम्ही विद्यार्थी महाविद्यालयाच्या प्रात्यक्षिक तासिकेला हजर होवू शकत नाही तर होणार्या ऑफलाइन परीक्षेला तोंड कसे देणार??? याची आम्हाला आजपासुनच भीती सोबतच चिंता वाटू लागली आहे.

उन्हाळी परिक्षेबाबत महाराष्ट्रातील विद्याथ्र्यांचे लाखो प्रश्न आहेत पण दुर्दैवाने राज्य सरकार व (२) विदयापीठ कोणीही दखल घेताना दिसत नाही. महाराष्ट्रात अनेक विद्यापीठे आहेत परंतू प्रत्येक विद्यापीठ उन्हाळी सत्र परिक्षेसाठी वेगवेगळे निर्णय घेताना दिसत आहे आणि या निर्णयामुळे जिथे ऑनलाइन परिक्षा जाहिर केल्या आहे तिथल्या विद्याथ्र्याला अधिक गुण प्राप्त होइल मग इतर विद्यार्थी त्यांच्याशी स्पर्धा कशी करणार या निर्णयामुळे विद्याथ्र्यांवर स्पष्ट अन्याय होइल. सगळे ऑनलाइन परिक्षेतील गैरप्रकारांबद्दल बोलत आहे परंतू अभ्यासक्रम, निवास, प्रवास, लसीकरण आणि विद्याथ्र्यांच्या मानसिक आरोग्याबद्दल कोणीही बोलताना दिसत नाही.

३) अभ्यासक्रमाच्या बाबतीत बोलायच झाल तर केवळ किंवा २ महिन्यांच्या कालावधीत अभ्यासक्रम पूर्ण करने व असायमेंट (हस्तलिखित स्वाध्याय) प्रैक्टिकल, मिनी प्रोजेक्ट आणी ईतर काही गोष्टी इतक्या कमी वेळेत पूर्ण करून देणे शक्यच नाही आणि झाल्यास त्यामध्ये अनेक विद्यार्थाचा शैक्षणिक नुकसान होण्याचे दाट शक्यता दिसून येते. शिवाय इतका कमी वेळ अभ्यासासाठी असताना सुद्धा अभ्यासक्रमात कोणताही व कुठल्याही प्रकारचा बदल झालेला नाही मग केवळ १ किंवा २ महिन्याच्या कालावधीत खरंच अभ्यासक्रम पूर्ण होईल कार? याची चिंता आम्हा विद्यार्थाना वाटते आहे..

(४) राज्य शासनाने कोरोनाचे निबंध जरी पुर्णपणे शिथिल केले असले तरी अजुन कोरोनाचा कहर राज्यातून गेलेला नाही तसेच महाराष्ट्र राज्यात विशेष म्हणजे आमच्या यवतमाळ व चंद्रपुर जिल्हयात कडाक्याची ऊन असल्याने राज्यात उष्मघतेचा प्रमाण व मृत्यदर हळूहळू का होईना पण जोर धरु लागला आहे त्यात इतक्या तळपत्या उनामध्ये आम्ही विद्यार्थी ३ तास परिक्षेसाठी कसै सज्ज अशु शकतो?? याचा मात्र विचार कोणीही करताना दिसत नाही.त्यामुळे ऑफलाइन परीक्षेला आमचा मुळीच विरोध नाही परंतू आम्हा विद्यार्थाच्या मागण्या देखील रास्त आहेत त्याकडे सुद्धा दुर्लक्ष करून चालणार नाही. कोविड-19 सारख्या संकटाचा प्रभाव जरी कमी झाला असेल परंतू पुर्णपणे राज्यातून हद्दपार झालेला नाही त्यामुळे खबरदारी घेतलीच पाहिजे त्याशंगाने उन्हाळी सत्र परिक्षेमध्ये ऑनलाइन हा पर्याय उपलब्ध करून दिलाच पाहिजे अन्यथा आम्ही होनार्या उन्हाळी सत्र ऑफलाइन परिक्षेवर बहिष्कार टाकत तीव्र विद्यार्थी आंदोलन उभे करुया करिता सर्वस्वी जबाबदार शासन, प्रशासन व विद्यापीठ (परिक्षा विभाग) राहिल हि विनंती……

करिता आपणांस नम्र निवेदण सादर…..

विशेष निवेदन: चर्चेला वेळ देण्यात यावी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून आपणांस चर्चा करण्यास आग्रही आहे करिता विशेष विनंती…..

Updated : 5 April 2022 11:10 AM GMT

Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.