उत्तर प्रदेशमध्ये आत्तापर्यंत दोन राष्ट्रीय पक्षांचा फ्लॉप शो‼️

उत्तर प्रदेशमध्ये आत्तापर्यंत दोन राष्ट्रीय पक्षांचा फ्लॉप शो‼️

उत्तर प्रदेशात भाजपची मुसंडी; २७४ जागांवर आघाडी‼️

म मराठी ❗लेटेस्ट अपडेट

उत्तरप्रदेशमध्ये सर्वाधिक जागांवर आघाडीवर असलेला पक्ष हा भाजप ठरला आहे.

भाजपने २७४ जागांवर आघाडी घेतली आहे. तर दोन नंबरला सपा हा अखिलेश यादव यांचा पक्ष आहे. त्यांनी १२० जागांवर आघाडी घेतली आहे.

आत्तापर्यंत मायावती यांच्या पक्षाला फक्त ५ जागांवर आघाडी घेता आली आहे. त्यामुळे भाजपने बसपाचा हत्ती सपाट केल्याचे दिसत आहे. गोरखपूरमधून योगी आदित्यनाथ यांनी ४० हजारांहून अधिक आघाडी घेतली आहे.

पाच राज्याच्या निवडणुकीमध्ये ४ राज्यात भाजपला यश आल्याचे दिसत आहे. उत्तर प्रदेश मध्ये पुन्हा एकदा योगींचें सरकार येणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे काँग्रेस आणि सपाला मोठा झटका बसला आहे.

भारतीय निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार उत्तर प्रदेशात भाजपला २७४ जागांवर आघाडी मिळाली आहे. तर, सपाला १२० जागांवर आघाडी मिळाली.

➖➖➖➖➖➖➖➖➖

उत्तर प्रदेशमध्ये आत्तापर्यंत दोन राष्ट्रीय पक्षांचा फ्लॉप शो‼️

उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि बहुजन समाज पक्ष हे दोन राष्ट्रीय पक्ष आतापर्यंत दोन अंकी आकडा पार करू शकलेले नाहीत.

सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये बसपा ५ आणि काँग्रेस केवळ ६ जागांवर पुढे आहे.

निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार भाजप २४३, समाजवादी पक्ष ११८, काँग्रेस ६ आणि बसपा केवळ पाच जागेवर पुढे आहेत.

काँग्रेस आणि बसपा हे दोन्ही राष्ट्रीय पक्ष आहेत. काँग्रेसने यावेळी यूपीमध्ये प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली होती आणि मायावतींच्या नेतृत्वाखाली बसपा रिंगणात होती.

मायावती २००७ साली मुख्यमंत्री झाल्या मात्र, २०१२ मध्ये त्यांच्या पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर बसपा पुन्हा सत्तेत आलेला नाही.

काँग्रेसबद्दल बोलायचे झाले तर जवळपास तीन दशकांनंतर सर्व ४०३ जागा युती न करता लढत असली तरी ट्रेंडमध्येही पक्षाची अवस्था वाईट असल्याचे दिसून येत आहे.

Updated : 10 March 2022 10:02 AM GMT

Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.