आयपीएल 2022: दोन कोटी मूळ किंमत असलेल्या या 3 भारतीयांवर लागू शकते मोठी बोली

आयपीएल 2022: दोन कोटी मूळ किंमत असलेल्या या 3 भारतीयांवर लागू शकते मोठी बोली

पुणे- इंडियन प्रीमियर लीगच्या अधिकृत संकेतस्थळानुसार आयपीएल 2022 मेगा लिलावासाठी तब्बल 1,214 खेळाडूंनी नोंदणी केली आहे. ज्या क्रिकेटपटूंनी लिलावासाठी नावे दिली आहेत, त्यापैकी 896 भारतीय आणि 318 परदेशी खेळाडू आहेत.
12 आणि 13 फेब्रुवारीला बेंगळुरू येथे होणार्‍या आगामी लिलावासाठी तब्बल 49 खेळाडूंनी आपली मूळ किंमत 2 कोटी रुपये ठेवली आहे. यामध्ये 17 भारतीय आहेत आणि उर्वरित 32 परदेशी क्रिकेटपटू आहेत. रविचंद्रन अश्विन, शार्दूल ठाकूर, इशान किशन, हर्षल पटेल, युझवेंद्र चहल, शिखर धवन, श्रेयस अय्यर आणि मोहम्मद शमी ही भारतीय क्रिकेटमधील काही मोठी नावे आहेत ज्यांंची मूळ किंमत 2 कोटी आहे. या वरील नावांपैकी काही भारतीय खेळाडूंकच्या फॉर्म आणि अष्टपैलू कामगिरी करण्याच्या क्षमेतेमुळे त्यांच्यावर मोठी बोली लागण्याची शक्यता आहे. यामध्ये शार्दूल ठाकूर, इशान किशन आणि हर्षल पटेल यांना मोठी मागणी असेल.

1) शार्दुल ठाकूर
अष्टपैलू म्हणून शार्दुल ठाकूरचा दर्जा गेल्या वर्षभरात लक्षणीय वाढला आहे. द गाबा आणि ओव्हल येथे झालेल्या कसोटी विजयात त्याने अष्टपैलू कामगिरी करत महत्त्वाच्या भूमिका बजावल्या. दक्षिण आफ्रिकेत जरी भारताने कसोटी आणि एकदिवसीय दोन्ही मालिका गमावल्या तरी शार्दूने काही संस्मरणीय खेळी केल्या.
ठाकूर 2021 मधील आयपीएल विजेत्या चेन्नई सुपर किंग्जच्या सदस्यांपैकी एक होता. त्याने अंतिम सामन्यात महत्त्वपूर्ण कामगिरी करत कोलकाता नाइट रायडसला रोखताणा 38 धावांवर 3 फलंदाज बाद केले.
30 वर्षीय खेळाडू बॅट आणि बॉल दोन्हीसह महत्त्वपूर्ण योगदान देण्यास सक्षम आहे, जे गेल्या काही महिन्यांपासून जागतिक क्रिकेटने पाहिले आहे. त्यामुळे यंदाच्या लिलावात शार्दूल ठाकूरवर मोठी बोली लागेल यात शंका नाही.

2) इशान किशन
आपल्या स्फोटक फलंदाजी आणि यष्टीरक्षणामुळे इशान किशनला दोन नवीन संघ लिलावापूर्वी करारबद्ध करतील असे वाटत होते. पण, तसे झाले नाही आणि किशन आता मेगा लिलावात सर्वांसाठी उपलब्ध असले. किशनने या लिलावासाठी आपली मूळ किंमत 2 कोटी रुपये ठेवली आहे.
हा 23 वर्षीय भारतीय खेळाडू युवा फलंदाजांपैकी सर्वात स्फोटक फलंदाज मानला जातो. किशन संघात असण्याचा फायदा म्हणजे तो एकतर डावाची सुरुवात करू शकतो किंवा मधल्या फळीत फलंदाजी करू शकतो. याशिवाय गरज पडल्यास तो यष्टीरक्षणातही माहिर आहे.

3) हर्षल पटेल
हर्षल पटेलने 2021 मध्ये आयपीएल पदार्पण केले होते. परंतु 2021 च्या हंगामातच त्याने खरा प्रभाव पाडला. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचे प्रतिनिधित्व करताना, या वेगवान गोलंदाजाने 15 सामन्यांमध्ये 14.34 च्या सरासरीने 32 बळी घेतले, यासह ड्वेन ब्राव्होच्या आयपीएल हंगामात सर्वाधिक बळी घेण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली.
आयपीएल 2021 च्या यशानंतर, हर्षलने गेल्या वर्षाच्या अखेरीस न्यूझीलंड विरुद्ध भारतासाठी एक संस्मरणीय टी20 पदार्पण देखील केले. त्याच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात 25 धावांत 2 बळी घेऊन तो सामनावीर म्हणून निवडला गेला. एक तेजस्वी वेगवान गोलंदाज असण्याव्यतिरिक्त, हर्षल बॅटनेही देखील योगदान देऊ शकतो त्यामुळे प्रत्येक संघ त्याला आपल्या ताफ्यात खेचण्यासाठी उत्सुक असेल.

Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.