आता पॅकेटवर MRP आणि युनिटची किंमत हि लिहावी लागणार – 1 एप्रिल पासून नवा नियम‼️

म मराठी ❗लेटेस्ट अपडेट
अन्न ग्राहक मंत्रालयाने मेट्रोलॉजी नियम 2011 मध्ये सुधारणा केल्या आहेत – यामुळे नवीन नियमानुसार आता कंपन्यांना पॅकेज केलेल्या वस्तूवर MRP तसेच युनिट विक्रीची किंमत देखील लिहावी लागेल…..!
याद्वारे ग्राहकांना खरेदीवर होणारा नफा-तोटा याची माहिती मिळणार आहे – असे अन्न ग्राहक मंत्रालयाने सांगितले
आणखी काय सांगितले ग्राहक मंत्रालयाने ❓
आता प्रत्येक पॅक केलेल्या वस्तूचा दर दोन प्रकारे लिहिला जाणार आहे म्हणजेच एक दर कमाल किरकोळ किमतीचा असेल तर दुसरा दर युनिट किमतीचा असेल
म्हणजेच 5 किलो पिठाच्या पॅकेटवर 1 किलो पिठाची किंमत देखील लिहावी लागेल ,ही युनिट विक्री किंमत असेल – तसेच एकत्रितपणे त्या संपूर्ण पॅकेटची एमआरपी देखील लिहावी लागणार
मात्र पॅकेट 1 किलोपेक्षा कमी असेल तर त्यावर प्रति ग्रॅम युनिट विक्री किंमत लिहावी लागणार – याद्वारे ग्राहकांना ते प्रत्येक ग्रॅमसाठी किती पैसे देत आहेत हे समजू शकणार आहे
तसेच हा नवा नियम 1 एप्रिल 2022 पासून लागू होणार आहे – दरम्यान याविषयी आणखी काही अपडेट आले तर आम्ही तुमच्या पर्यंत नक्कीच पोहचवू
केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय – आपल्यासाठी नक्कीच खूप महत्वाचा आहे, आपण थोडासा वेळ काढून – इतरांना देखील अवश्य शेअर करा