“आता उर्फी जावेदला कॉपी करतात का…’ अन् ‘त्या’ ड्रेसमुळे दीपिका पदुकोण झाली ट्रोल

“आता उर्फी जावेदला कॉपी करतात का…’ अन् ‘त्या’ ड्रेसमुळे दीपिका पदुकोण झाली ट्रोल

मुंबई – दिग्दर्शक शकुन बत्रा यांचा आगामी चित्रपट ‘गहराइयां’ सोशल मीडियावर बऱ्याच काळापासून चर्चेत आहे. या चित्रपटात अभिनेत्री दीपिका पदुकोण, अनन्या पांडे आणि अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी हे सर्व लीड रोल मध्ये असणार आहेत. त्यासोबतच धैर्य करवा, नसीरूद्दीन शाह, रजत कपूर हेही महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहेत.

नुकतंच, या चित्रपटाचा ऑफिशल ट्रेलर आणि चित्रपटातील पाहिलं ‘डूबे’ गाणं रिलीज करण्यात आला आहे. फॅन्स कडून सोशल मीडियावर या गाण्याला प्रचंड प्रेम मिळतं आहे. आता चित्रपटातील सर्व कलाकार हे चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसत आहेत. दरम्यान दीपिका पदुकोणने घातलेल्या कपड्यांमुळे तिला ट्रोल केले जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

दोन दिवसांपूर्वी दीपिका आपल्या सह कलारांसोबत चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गेली होती. यावेळी दीपिकाने भगव्या रंगाचा लाँग वनपिस परिधान केला आहे. या लूकमध्ये ती अतिशय हॉट दिसत आहे. पण या ड्रेसमुळे दीपिकाला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. एका यूजरने तर थेट ‘उर्फी जावेदकडून दीपिकाला प्रेरणा मिळाली आहे’ असे म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

यूजरने ‘बॉलिवूड अभिनेत्री आता उर्फी जावेदला कॉपी करतात’ असे म्हणत सुनावलं आहे. तर दुसऱ्या एका यूजरने ‘दीपिका आणि अनन्या दोघींनाही उर्फी जावेदकडून प्रेरणा मिळाली आहे’ असे म्हटले आहे. दीपिकाचा हा ड्रेस प्रचंड बोल्ड असून, यामध्ये ती अतिशय मादक दिसत होती. या ड्रेस मुळे दीपिकाच्या सौदर्याला चार चाँद लागले आहेत.

‘गहराइयां’ हा एक रिलेशनशिप ड्रामा आहे. आजच्या जगातील तरूणाईची स्वच्छंद जगण्याची उर्मी आणि यादरम्यानची नात्यांची गुंतागुंत हे सगळं या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. तसेच, या चित्रपटात दीपिका आणि सिद्धांत चतुर्वेदी या दोघांची बोल्ड केमेस्ट्री सुद्धा दिसून येणार आहे. ‘गहराइयां’ चित्रपट येत्या11 फेबु्रवारीला रिलीज होतोय.

Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.