अखेर त्या शीर विहीन निर्वस्त्र युवतीची ओळख पटली

अखेर त्या शीर विहीन निर्वस्त्र युवतीची ओळख पटली

संशयित आरोपी पोलिसांच्या रडारवर

4 एप्रिलला भद्रावती येथे तेलवसा मार्गावरील मक्रोन शाळेच्या मागील परिसरात ओसाड शेतात एका 22 वर्षीय युवतीचा शीर नसलेला मृतदेह आढळल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. घटनस्थळावरून प्राप्त पुराव्यांवरून सदर युवतीची हत्या झाल्याचे उघड होते मात्र हत्या झालेल्या युवतीची ओळख पटू नये म्हणून त्या क्रुरकर्म्यांनी चक्क युवतीचे शीर कापुन नेले होते.

एव्हढ्यावरच समाधान झाले नसल्याने त्या युवतीला निर्वस्त्र करून तिचा मृतदेह फेकून देण्यात आला होता. पोलीस स्टेशन भद्रावती येथे अज्ञात इसमांविरुध्द अपराध क्रमांक १४१ / २०२२ कलम ३०२, २०१ भादंविचा गुन्हा नोंदविण्यात येऊन तपास सुरू करण्यात आला होता अखेर तपासला यश प्राप्त झाले असुन पोलिसांना तरुणीची ओळख पटविण्यात यश मिळाले असुन पोलिसांना काही संशियत लोकांची माहिती प्राप्त झाल्याचे सूत्रांकडून कळले असुन ते संशयित आरोपी पोलिसांच्या रडारवर आहेत हे विशेष.

निर्घृण हत्या करून मयतेची ओळख पटू नये ह्यासाठी शीर कापून युवतीचा नग्न मृतदेह फेकून पोलिसांच्या डोळ्यात धूळ झोकण्याचा गुन्हेगारांनी केलेला प्रयत्न नियोजनबध्द असल्याचे तसेच गुन्हेगार हे थंड रक्ताचे असल्याचे लक्षात येत होते सोबतच ते सराईत असावेत असेही जाणवत होते मात्र घटनेची माहिती कळताच चंद्रपूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देवून मृतदेहासह परिसराची पाहणी केली. हत्या करणाऱ्याने गुन्ह्याचे पुरावे / खुणा / निशानी सोडली नसल्याने सदर मृत तरुणीची ओळख पटविणे हे पोलीसांसमोर मोठे आव्हान होते.

घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखेतील सर्व अधिकारी व पथक तसेच सायबर सेल मधील सायबर एक्सपर्ट यांचे मार्फतीने मृत महिलेच्या शरीरावरील खुणा, मृत देहाजवळ मिळालेल्या तिच्या वापराच्या वस्तु ईत्यादि शोध पत्रिका तयार करून शोध घेण्यात आला. तसेच चंद्रपूर व बाजुच्या सर्व जिल्हयातुन मागील काही दिवसांत ह्या वयाच्या हरवलेल्या / पळुन गेलेल्या मुलींच्या माहिती घेण्याचा प्रयत्न सुरू होता. घटना घडुन काही दिवस होवुनही कोणत्याही मुलीच्या हरवल्याची तक्रार प्राप्त झाली नाही त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखा व सायबर सेल यांनी तांत्रीक तपास केला तसेच गोपनिय माहिती मिळविण्याचा अहोरात्र प्रयत्न केला त्यामध्ये पोलीसांना यश आले.

गोपनिय माहितीदाराकडुन सदर महिलेचे ओळख पटविण्यात आली तिचा मोबाईल क्रमांक प्राप्त करण्यात आला, त्यावरुन तिच्या राहते घराचा रामटेक जिल्हा नागपूर येथील पत्ता प्राप्त झाला त्यावरून तिची मोठी बहीण हिच्याशी संपर्क साधुन ओळख पटविण्याची खात्री करण्यात आली. तिच्या बहीणीने तिच्या शरीरावरील वर्ण व वापरातील वस्तु पाहुन मृत महिला ही तिची बहीण असल्याची खात्री केली.

मयत युवती ही स्वतंत्र राहत असल्याने ती बेपत्ता असल्याचे अथवा तिच्या सोबत कुठलीही अप्रिय घटना घडली असल्याची कुटुंबीयांना संशय आला नसल्याने पोलिसांना कुठलीही तक्रार देण्यात आली नसल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. सदर खुनातील आरोपी शोधण्याचे स्थानिक गुन्हे शाखा तसेच भद्रावती पोलीस स्टेशन, सायबर सेल चे विविध पथक पोलीस अधीक्षक अरविंद साळवे व अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे मार्गदर्शनात तपास करीत आहेत.

या प्रकरणी काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून लवकरचं या आव्हानात्मक गुन्ह्याचा पर्दाफाश होणार अशी माहिती आहे. सदर युवतीचा एका ठिकाणी खून करीत तिचे शीर कापण्यात आले, नंतर त्या युवतीचा मृतदेह भद्रावती येथे टाकून आरोपी पसार झाले अशी माहिती आहे.

मयत मृतदेहाची ओळख पटविण्याची कामगिरी पोलीस अधीक्षक अरविंद साळवे व अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, सपोनि जितेंद्र बोबडे, सपोनि संदीप कापडे, पोउपनि अतुल कावळे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार व सायबर सेल चे तज्ज्ञ मुजावर अली, वैभव पत्तीवार, राहुल पोंदे, भास्कर चिंचवलकर, संतोष पानघाटे व उमेश रोडे यांनी केली.

Updated : 9 April 2022 12:56 PM GMT

Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.