अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण

यवतमाळ (वासीक शेख) : मराठा आरक्षणासह मराठा समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबित असल्याने व त्यांची सोडवणुक न झाल्याने त्यांची त्वरीत अंमलबजावणी व्हावी या मागण्यांसाठी मा.खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी आज शनिवार दिनांक 26 फेब्रुवारी 2022 रोजी मुंबई आझाद
मैदानावर आमरण उपोषणाची सुरुवात केली आहे. त्यांच्या समर्थनार्थ अखिल भारतीय मराठा महासंघ,यवतमाळ जिल्हा शाखेच्या वतीने मा. उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना एका निवेदनाद्वारे मराठा समाजातील विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले तसेच एक दिवसीय लाक्षणिक उपोषण यवतमाळ येथील नगरपरिषद कार्यालयासमोर आयोजित करण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की आम्ही सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते अखिल भारतीय मराठा महासंघ,यवतमाळ जिल्हा शाखेच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषणास बसलो होतो.आमच्या पुढील प्रमाणे मागण्या आहेत.मराठा आरक्षण मिळविण्यासाठी अपेक्षित न्या. दिलीप भोसले यांच्या समितीने सांगितलेले 12 मुददे व मराठा आरक्षण मिळविण्यासाठी आवश्यक निर्णय शासनाने गांभीर्याने घेवुन पुढील कार्यवाही सुरू करावी.ESBC SEBC आरक्षणाच्या माध्यमातून शासकीय सेवेत निवड झालेल्या पण अद्यापही नियुक्ती न झालेल्या उमेदवारांना त्यांची ज्या पदावर निवड
झालेली आहे त्याच पदावर कायमस्वरूपी नियुक्ती दयावी. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मार्फत देण्यात येणाऱ्या व्याज परताव्याची मर्यादा वाढवावी.भरीव आर्थिक निधीची तरतुद करून महामंडळाकडे पैसे वर्ग करण्यात यावे. सधा या महामंडळाला पुर्णवेळ कार्यकारी संचालक व धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी आवश्यक असणारे संचालक मंडळ निवडणे आवश्यक आहे.
सारथी संस्थेच्या सबलीकरणासाठी रोड मॅप तयार करून सारथी संस्थेचे सक्षमीकरण करावे. आणि येणाऱ्या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पात यासाठी भरीव निधीची तरतुद करावी.मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी राज्यातील प्रत्येक जिल्हयात वसतिगृह तात्काळ सुरू करावे.मराठा आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनातून ज्या आत्महत्या झाल्यात त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्याच्या आश्वासनाची पुर्तता करावी.आंदोलन करणाऱ्या तरूणांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत शासनाने काढलेल्या नव्या शासन निर्णयात झालेल्या मालमत्तेचे नुकसान भरपाई बाबत उल्लेख आहे. ते गुन्हे मागे घेण्यात यावे.कोपर्डी खून खटल्याची लवकराव लवकर सुणावणी घेण्यात यावी. यासाठी पाठपुरावा करून आरोपींना फाशीची शिक्षा होण्यासाठी आग्रही रहावे.वरील मागण्यांची,आश्वासनानंतरही अंमलबजावणी न झाल्याने समाजातील तरूणांमध्ये नैराश्य येवुन संतापाची लाट निर्माण झाली आहे.
या समाजाचा आता अधिक अंत न पाहता त्वरीत निर्णय शासनाने घ्यावा आणि पुन्हा एकदा रस्त्यावरची लढाई लढण्यास या समाजाला बाध्य करू नये. असे या मागण्यांचे निवेदन माननीय मुख्यमंत्री साहेबांना पाठविण्यात आले. या निवेदनावर एडवोकेट मनोज राजगुरे, लक्ष्मण गवळी, संजय काळे, मनोहर जाधव, राहुल पवार, आशिष मानकर, राहुल कान्हारकर, पंकज मुंदे, शुभम लांडगे, अनिल वाघमारे, दिनेश रनानवरे, बाळासाहेब वाढस्कर, अक्षय कदम, महादेव पवार, सुरेंद्र जगदाळे आदींचे स्वाक्षऱ्या होत्या.यावेळी या उपोषण मंडपात शहरातील नामवंत राजकीय व सामाजिक प्रतिनिधींनी तसेच प्रसार माध्यमांचे अनेक प्रतिनिधींनी भेट दिली.